‘आम्ही साहित्यप्रेमी’चे ओरोस येथे रविवारी श्रावणधारा कविसंमेलन

सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाचा हा सलग १८ वा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस जैतापकर कॉलनी येथील दत्तराज गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात रविवारी सायंकाळी ५ वाजता हे कविसंमेलन होणार आहे. या कविसंमेलनात कोणाही कवी, कवयित्री आणि रसिक याना सहभागी होत येईल. कविता सादर करणाऱ्यांनी यासाठी वेळेवर उपस्थित राहून आल्यावर आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक राहील. कवीनी कोणतीही प्रस्तावना न करता स्वरचित कविता सादर करायची आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाचे समन्वयक सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी केले आहे.



