मुंढर (ता. गुहागर) येथे १ एप्रिल रोजी पालखी नृत्य स्पर्धा

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंढर शाखा आयोजित आणि मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुंढर मनसे शाखा कार्यालयासमोरील पटांगणात या स्पर्धा होतील. या पालखी नृत्य सोहळ्याचे उद्घाटन मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद शिर्के व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
या पालखी नृत्य सोहळ्यात जिल्ह्यातील नामवंत पालखी नृत्य पथक सहभागी होणार आहेत. पालखी नृत्य सोहळ्यात श्री स्वयंभू सोमेश्वर पालखी नृत्य पथक मुंढर, श्री खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेणे, श्री चंडीकाई देवी पालखी नृत्य पथक मळण, श्री पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गताम्हाने, श्री साई सेवा महिला मंडळ, आंबेशेत ता. रत्नागिरी आदी संघ सहभागी होणार आहेत.



