क्रीडामुख्य बातमी

आदर्श हायस्कूल कुरतडेच्या विद्यार्थ्यांची शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

रत्नागिरी : तालुक्यातील कुरतडे येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले असून, संपूर्ण पंचक्रोशीत शाळेचा डंका वाजवला आहे.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील विभागात सोहम खंडेराव पाटील (४२ किलो वजनी गट), समर्थ कुदळे (४६ किलो वजनी गट), १६ वर्षांखालील मुली विभागात अनुराधा गांजवे (४६ किलो वजनी गट), १७ वर्षांखालील विभागात अथर्व घाडगे (५१ किलो वजनी गट), आविष्कार चौगुले (६५ किलो वजनी गट) यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव नोंदवले. त्यांची निवड आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे क्रीडा शिक्षक मानसिंग कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल घोरपडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती आंबर्डेकर आणि आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. मांडवकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!