मुख्य बातमी

रत्नागिरीत राधा-कृष्ण सजावट स्पर्धा उत्साहात; ८४ बालगोलांचा सहभाग

रत्नागिरी : प्रभाग १५ चे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राधा-कृष्ण सजावट स्पर्धा २०२६ कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृह, पटवर्धन हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या अनोख्या स्पर्धेत १५ वर्षांखालील तब्बल ८४ मुले-मुलींनी सहभाग घेऊन राधा आणि कृष्णाची विविध मनमोहक रूपे साकारली. विविध धर्मातील बालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने या कार्यक्रमात सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.

कार्यक्रमाला रत्नागिरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे सुनील उर्फ दादा वणंजू, नित्यानंद भुते, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेना शिंदे सेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नितीन तळेकर, मुकुंद विलणकर तसेच परीक्षक म्हणून मुख्याध्यापिका सौ. धनश्री मुसळे व सौ. आसावरी पावसकर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कियांश गोरिवले, द्वितीय क्रमांक गार्गी बोरकर, तृतीय क्रमांक सृष्टी शेट्ये तर उत्तेजनार्थ सान्वी गावखडकर व सक्षम पेडणेकर हे मानकरी ठरले. याशिवाय उत्कृष्ट राधा (बालगट) अन्मेया घुडे व उत्कृष्ट कृष्ण (बालगट) अद्वैत उपळकर व श्रीतेज कदम यांना गौरवण्यात आले.

बालगोपाळांच्या आकर्षक वेशभूषा आणि उत्साह पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!