शौर्या जाधव हिला “स्वप्न सुंदरी” पुरस्कार प्रदान

आबलोली (संदेश कदम) : सिझन २०२६ या मॉडेलिंग स्पर्धेत मौजे लोवले (ता. संगमेश्वर) येथील शौर्या स्नेहल अमर जाधव या मुलीने “सौंदर्य सुंदरी” पुरस्कार किताब पटकावला. या स्पर्धेत लहान – मोठ्या गटांत मिळून २५ मुली आणि स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. अडीच वर्षांच्या गटातून छोट्या गटातून शौर्या जाधव हिची निवड करण्यात आली. पनवेल टाइम्सने ही स्पर्धा आयोजित केली होती.
मॉडेलिंग कोरिओग्राफर देवदत्त घरत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप, शिल्ड, क्रोन, सौंदर्य सुंदरी पट्टा असे होते.
या कार्यक्रमासाठी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, आमदार, प्रशांत ठाकूर, आमदार, विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे आणि महाराष्ट्राची लावणी क्वीन हिंदवी पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.



