मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गोवळकोटच्या ऐतिहासिक लढाई स्मरण दिनानिमित्त ३ ऑक्टोबरला विशेष कार्यक्रम

‘५ ऑक्टोबर १७३३ ची रक्तरंजित पहाट’ नाट्यप्रयोगातून रणसंग्रामाचा इतिहास उलगडणार

चिपळूण : दि. ५ ऑक्टोबर १७३३ रोजी झालेल्या गोवळकोटच्या ऐतिहासिक रणसंग्रामाच्या स्मरणार्थ ३ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे विशेष लढाई स्मरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

गोवळकोटच्या ऐतिहासिक भूमीत घडलेल्या रणसंग्रामातील शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात ‘गोवळकोटचा रणसंग्राम – ५ ऑक्टोबर १७३३ ची रक्तरंजीत पहाट’ हा विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

राधेकृष्णा एन्टरटेन्मेंट, सांखवाळ-गोवा प्रस्तुत महिला नाट्यकर्मींच्या वतीने हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या रणभूमीवरील ऐतिहासिक प्रसंग, वीरांचा पराक्रम, संघर्ष आणि स्वराज्यासाठी केलेला त्याग नाट्यरूपातून साकारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पराक्रमी सरनौबत आनंदराव गोळे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि या रणसंग्रामाची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, युवा वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लढाई स्मरण दिन आणि विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान आणि राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!