मुख्य बातमी

मेर्वी येथील भगवती देवीचा नवरात्रोत्सवास प्रारंभ

गावखडी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भुतेवाडीतील जागृत देवस्थान श्री भगवती देवीचा नवरात्र उत्सव भक्तीमय वातावरणात रविवारपासून (११ ऑक्टोबर) प्रारंभ झाला आहे.

या नवरात्र उत्सवानिमित्त रविवारी सकाळी नऊ वाजता देवीचे मुखवटे लावण्यात आले. त्यानंतर अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली असून, दररोज सायंकाळी साडेसात वाजता देवीची आरती व रात्री दहा वाजता ग्रामस्थांचे भजन सादर करण्यात येईल. त्याचप्रमाणे १८ ऑक्टोबर रोजी बलिदान दिवशी दुपारी बारा वाजता देवीची आरती, प्रसाद रात्री आठ वाजता भगवती देवीचा गोंधळ आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी तोरणे बांधण्यात येणार आहेत. देवीची पूजा आरती झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता सोने लुटून त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

या सर्व कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री भगवती देवीचा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी श्री भगवती देवी ग्रामस्थ मंडळांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती दीपक भुते यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!