मुख्य बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात २६ ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा; ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने उद्या (२६ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.


