मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १९ वर्षीय मुलावर तिरळेपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

चिपळूण : बी.के.एल. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, सावर्डे येथे तिरळेपणाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली.

साळुंखे कुटुंबात सुमितच्या जन्माने आनंदाचे वातावरण निर्माण झाले; मात्र जसजसा तो मोठा होत गेला, तसतसे त्याचे डोळे तिरळे असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे त्याला दैनंदिन कामे, अभ्यास आणि वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासंदर्भात अडचणींचा सामना करावा लागत होता. तिरळेपणावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात आणि ही सुविधा वालावलकर रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात तपासणी करून घेतली. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त डोळ्याच्या स्नायूंना भूल देण्यात आली. या उपचारात शस्त्रक्रिया करून सैल झालेले स्नायू घट्ट करणे आणि घट्ट स्नायू सैल करून डोळा योग्य दिशेला आणण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!