मुख्य बातमीराजकारण

अनेक महिलांनी केला ‘मनसे’मध्ये जाहीर प्रवेश

रत्नागिरी : शहरातील अनेक महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महिला शहर सचिव संपदा राणा यांच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

राज ठाकरे यांची मराठीबाबतीत असलेली भूमिका तसेच त्यांचे पदाधिकारी रत्नागिरीमध्ये करत असलेल्या लोकोपयोगी कामांनी प्रेरित होऊन आपण आज ‘मनसे’चे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

आगामी काही दिवसांत अजून पक्ष प्रवेश होतील, असे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहर अध्यक्षा सुश्मिता सुर्वे, शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!