मुख्य बातमी

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना 

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल (९ एप्रिल) रत्नागिरी दौऱ्यावर असताना पांढरा समुद्र मिऱ्या बंदराची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची माहिती घेतानाच बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हा बंधारा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो जनतेसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!