गुहागर- जानवळे गावचे सुपुत्र एस.के. यांच्या “तुझ्या नादान”गाण्याचा यु-ट्यूबवर धुमाकूळ
तीन दिवसांत दहा लाखांच्यावर व्ह्यू

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-जानवळे गावचे सुपुत्र आणि लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेता तसेच आयझेड कोकणातलेचे सुत्रधार शशांक सुर्यकांत कोंडविलकर तथा एस.के. यांच्या “तुझ्या नादान” या गाण्याने युट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत या गाण्याला दहा लाखांच्यावर व्ह्यू झालेत.

“तुझ्या नादान” या गाण्याची चाल आणि शब्द शशांक कोंडविलकर यांचे असून, स्नेहा महाडिक हिने हे गाणे गायले आहे. या गाण्याला संदीप भूरे यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यासाठी कलाकार म्हणून सॅन्ड्रीक डिसोझा आणि कांचन कोळी यांनी आपली यशस्वी अदाकारीची झलक दाखवली आहे. या गाण्यासाठी चेतन गरुड आणि सिध्देश पै यांनी डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. या गाण्याला म्युझिक लेबल टी सिरीज यांचा आहे.
या गाण्याने युट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून शशांक सुर्यकांत कोंडविलकर तथा एस. के. याच्या गाण्याने युट्यूबवर नावलौकिक मिळवला आहे.



