मुख्य बातमी
पतित पावन मंदिर येथे सकल हिंदू समाजाची बैठक

रत्नागिरी : पेहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने पतित पावन मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यात निष्पाप लोकांना मारलेल्या दहशतवादी व्यक्तींचाही निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या झेंड्यावर पाय देत हिंदू समाजाच्या लोकांनी मंदिरात प्रवेश केला.




