मुख्य बातमी

सकल हिंदू समाजातर्फे आज रत्नागिरीत हिंदू जनआक्रोश मोर्चा

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे पाकिस्तानातील आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पैकी २४ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून आणि कलमा पडायला लावून मारले गेले. या घटनेचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चाची सुरुवात शहरातील गाडीतळ, स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथून आज (२५ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता होईल. या मोर्च्यात आपण आपले राष्ट्रीय व धर्म कर्तव्य समजून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!