मुख्य बातमीसामाजिक

रत्नागिरी मनसेचे नूतन तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांचा वाढदिवस अनेक उपक्रमांनी साजरा

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी चे नूतन तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांचा वाढदिवस अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ५० महिलांना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून देण्यात आला. २० महिलांना मत्स्य मूल्यवर्धीत पदार्थ बनविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोबतच ३० महिलांना शिलाई कामाचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच एक दिवसीय मसाला बनविण्याचे प्रशिक्षण देखील सुरुवात करण्यात आली.

तालुकाध्यक्ष जन्मदिनानिमित्तकोणतीही बॅनरबाजी न करता त्या खर्चात मनसेकडून १०० महिलांना स्वयंरोजगारमध्ये परिपूर्ण बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यात आले.

लाडक्या नवनियुक्त तालुकाध्यक्ष सचिन शिंदे ना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर कार्यालयात गर्दी होती. यापुढेही सर्व पदाधिकारी यांचे जन्मदिन हे अशाच समाजपयोगी कार्यक्रमानी व बॅनर मुक्त असे साजरे करण्याचा निर्धार देखील करण्यात आला.

यावेळी पत्रकार, मित्रपरिवार यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हासचिव महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, शहर सचिव गौरव चव्हाण, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, सतीश खामकर, इम्रान नेवरेकर, महिला शहरअध्यक्ष सुश्मिता सुर्वे, शहर संघटक संपदा राणा, शहर सचिव बिस्मिल्लाह नदाफ, गीता गोसावी, रूपाली गोसावी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!