मुख्य बातमी

सायकलपटू मकरंद पटवर्धन यांचा सन्मान

रत्नागिरी : पत्रकारिता, फोटोग्राफी आणि शेती अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे मकरंद पटवर्धन यांचा सुवर्णसूर्य फाउंडेशन’, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मकरंद पटवर्धन यांनी तीन वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू केले. त्याने आतापर्यंत ८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकत हा छंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता लहान मुलांना मोबाईल, गेम्स यांच्या ट्रॅपमधून बाहेर काढून त्यांनाही सायकलिंगची गोडी लावली. मकरंद हे दै. सकाळचे बातमीदार आहेत. या सायकल प्रेमीचा ‘सुवर्णसूर्य फाउंडेशन’, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मुलांच्या घडवणुकीची, आनंद पेरत जाण्याची ही ‘सायकल’ अव्याहतपणे सुरू राहू दे अशी शुभेच्छा मकरंद यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!