पेजे महाविद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल (Results) ५ मे रोजी घोषित करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली असून, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के आणि कला शाखेचा निकाल ८४.६२ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतून जिया चंद्रशेखर आडविरकर ही ८०.०० टक्के मिळवून प्रथम, तनुजा संजय मेस्त्री ही ७२.०० टक्के मिळवून द्वितीय, तर दीक्षा प्रदीप कुड ही ६८.०० टक्के मिळवून तृतीय आली. वाणिज्य शाखेतून पूजा प्रमोद जुवळे ही ७४.०० टक्के मिळवून प्रथम, ऋषिकेश प्रकाश गितये ही ६९.०० टक्के मिळवून द्वितीय, तर कल्याणी जनार्दन आग्रे ही ६६.०० टक्के मिळवून तृतीय आली. कला शाखेतून शामल संतोष आडविलकर ही ६६.०० टक्के मिळवून प्रथम, सुयोग संतोष गिजबिले ६४.०० टक्के मिळवून द्वितीय, रिया रमेश पेजे ही ६३.०० टक्के मिळवून तृतीय आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संकुलामध्ये व पंचक्रोशीमध्ये कौतुक होत असून मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे ही अभिनंदन होत आहे. स्वर्गवासी नंदकुमार मोहिते यांची प्रेरणा व मुख्याध्यापक श्री. थुळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी व मुंबई शिक्षण कमिटीनेही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.



