जप्त मासेमारी बोट व डिझेल टँकरचा ९ मे रोजी लिलाव

रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोट जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार इसेन्शिअल कमोडिटी ॲक्ट १९५५ अंतर्गत लिलाव करण्यास मंजुरी दिलेली आहे. हा लिलाव ९ मे रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता या वेळेत दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे होणार आहे. लिलावासाठी मालमत्तेचे मूळ मूल्यांकन मासेमारी बोटीकरिता मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या माध्यमातून आणि डिझेल टँकर करीता प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
लाकडी व फायबर मासेमारी बोटीचा लिलाव मासेमारी बोट क्रमांक आयएनडी-एमएच-३-एमएम-६८५८ हा असून अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) ९ लाख ४१ हजार ६१८ रुपये आहे. ही मासेमारी बोट सध्या दाभोळ बंदर येथे ठेवण्यात आलेली आहे.
टाटा कंपनीच्या डिझेल टँकर वाहन क्रमांक एमएच-४६-बीएम-८४५७ (२०१९), मॉडेल टाटा एलपीटी ३५१८ सीआरई बीएस ४८X२, नोंदणीकृत भारक्षमता ३५ हजार केजीएस, अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) १४.७५ लाख रुपये, सध्या टँकर दाभोळ पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आलेला आहे.
लिलाव जशी आहे तशी स्थिती या तत्वावर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी लिलावापूर्वी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यशस्वी बोलीदाराने लिलावास्थळी एकूण बोलीच्या २५ टक्के रक्क्म चेकव्दारे तात्काळ व उर्वरीत रक्कम चेकव्दारे सात दिवसात भरावी लागेल. जिल्हाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही बोली नाकारण्याचा व लिलाव रद्द करण्याचा संपुर्ण अधिकार आहे. सर्व सहभार्गीनी वैध ओळखपत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड) व दोन पासपोर्ट साईज फोटो आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी ०२३५२-२७१२५६) ई-मेल lcb.ratna@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा.
