मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जानवळे गावच्या शशांक कोंडविलकर यांच्या गाण्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद

आबलोली (संदेश कदम) : लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेता आणि गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र शशांक सुर्यकांत कोंडविलकर तथा एसके यांच्या “मन झिम्माड” या गाण्याने युटूबवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

“मन झिम्माड” या गाण्याची चाल आणि शब्द एस.के. यांचे असून सुपरिचित गायिका स्नेहा महाडिक हिने हे गाणे गायले आहे. या गाण्याला संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केले असून संगीत संयोजन गणेश सुर्वे यांचे आहे. या गाण्यासाठी कलाकार म्हणून आकाश आवटे, उज्वला भांगरे यांनी आपली यशस्वी अदाकारीची कला दाखवली आहे. या गाण्यासाठी चेतन गरुड आणि सिध्देश पै यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, डीओपी उमाकांत येवले तर निर्मिती प्रमुख म्हणून विणा गरुड तसेच संकलन आणि डीआय दौलत सतराळकर (मुन्ना), प्रसिद्धी रचना रुषी निकाळजे, प्रोडक्शन हाऊस चेतन गरुड, प्रोडेक्शन, स्टुडिओ एल.एल.पी. यांनी काम पाहिले आहे. या गाण्याला म्युझिक लेबल टी- सिरीज यांचे आहे.

या गाण्याने युट्यूबवर कमी अवधीत चांगली प्रसिद्धी मिळवली आहेच; परंतु रिलमार्फत हे गाणे सध्या तुफान वायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!