मुख्य बातमी

वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

मरणोत्तर देहदान, नेत्रदान करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे आवाहन; १० मे रोजी रत्नागिरीत कार्यक्रम

रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (१० मे) रत्नागिरीत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. तसेच शुभेच्छा बॅनरद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बाळासाहेब आंबेडकर यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप तसेच कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराचे वितरण होणार आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गौतम गमरे यांनी स्वतः मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला आहे, तर महासचिव आदरणीय सिद्धार्थ कांबळे यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

या निमित्ताने पक्षाच्या वतीने नागरिकांना मरणोत्तर देहदान व नेत्रदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भारतीय सैन्यदलासाठी रक्तदानाचेही आवाहन पक्षप्रमुखांकडून करण्यात आले असून, इच्छुकांनी या समाजसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!