मुख्य बातमी

रत्नागिरीत “अनैतिक व्यापाराचा” पर्दाफाश

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत “अनैतिक व्यापार” सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे १३ मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ महिलांना आणल्या असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत “अनैतिक व्यापार” सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत लागलीच एक डमी गिऱ्हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्राच्या समोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी अरमान करीम खान हा याने ४ महिला आणलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अरमान खान याला दोन पंचां समक्ष “अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६” कायद्याअंतर्गत ताब्यात घेऊन घटना स्थळावरून तसेच आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेला मुद्देमाल तसेच ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हे पुढील कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा नितीन डोमणे, पो.हवा शांताराम झोरे, पो.हवा बाळू पालकर, पो.हवा प्रवीण खांबे, पो.हवा गणेश सावंत, पो.हवा सत्यजित दरेकर, व महिला पोलिस हवालदार श्रीमती वैष्णवी यादव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!