आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदाही १०० टक्के लागला असून, शाळेने सलग दहा वर्षे दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयातून रिद्धी प्रकाश मांडवकर ही ८३.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली. साहिल प्रदीप देसाई याने ८१ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर वेदांत विजय पवार याने ७५.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चंद्रकांत बाईत, सचिव सौ. स्नेहल सचिन बाईत, मुख्याध्यापक सौ. नेत्रा नरेंद्र रहाटे, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.



