मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी १६ जून ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात आला आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (डीएसडब्ल्यू) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!