मुख्य बातमीशैक्षणिक

मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशनचा पुढाकार

रत्नागिरी : बौद्धिक गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक मागासलेपणामुळे शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशन या एनजीओने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, प्रत्येकी १५ हजार रुपये खर्च असलेल्या पॅकेजचा आर्थिक भार संस्था उचलणार आहे.

केवळ आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता नववी व दहावीमध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी कमी पडतात. याचा विचार करून यंदा नववी आणि दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीने मुंबई येथील एका प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना खर्च उचलण्याची तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके, नोट्स, सराव पेपर्स देऊन त्यांना संपूर्ण वर्षभर अचूक मार्गदर्शन केले जाणार आहे. या पॅकेजची एका विद्यार्थ्याची वर्षाची फी १५ हजार रुपये इतकी आहे. अशा २५ विद्यार्थ्याचा आर्थिक भार संस्था उचलणार आहे.

हा संपूर्ण खर्च संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या वतीने HKCK Edutack ltd, Mumbai यांच्या सौजन्याने होणार आहे. संस्थेमार्फत २५ गरजू विद्यार्थ्यांची निवड केली असून, त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या २५ विद्यार्थ्यांना १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सुहेल मुकादम यांच्या जयस्तंभ (रत्नागिरी) येथील कार्यालयात बोलाविण्यात आले असून मुंबई येथील तज्ज्ञ मंडळी या विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचा हा यंदाचा पहिलाच शैक्षणिक उपक्रम असून यंदा ५० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे मुंबई अध्यक्ष फिरोज कोंडकरी यांनी मोलाची कामगिरी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमाला कोणी गरजूंना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गवाणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!