मुख्य बातमी

रत्नागिरी पोलीस दलामार्फत पूर्णगडमध्ये आढळलेल्या सर्व बांग्लादेशी नागरिकांचे “प्रत्यार्पण”

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्णगड येथे ११ नोव्हेंबेर २०२४ रोजी आढळून आलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांचे प्रत्यार्पण रत्नागिरी पोलीस दलामार्फत २० मे रोजी करण्यात आले.

जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला ११ नोव्हेंबेर २०२४ रोजी एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी खालील नमूद १३ बांग्लादेशी नागरिक मिळून आले होते. वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली सर्वांकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली होती. याच आधारे रत्नागिरी पोलिस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला. मुदतीमद्धे या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते.

याच प्रकरणाची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी ६ महिने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व १३ दोषी बांग्लादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली व या सर्व बांग्लादेशी नागरिकांना २० मे रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात रत्नागिरी पोलिस दलाला यश आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी जि.वि.शा नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पूर्णगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे, नियंत्रण कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, संतोष करळकर, प्रवीण पाटील, नितीन डोळस, पो.शी दत्तात्रय शिंगारे, अभय गायकवाड, प्रवीण चौगुले, संहिल गाडेकर, जितेंद्र लाहानगे, सूरज पन्हाळकर या पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!