मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

शशिकांत सुर्वे यांची शृंगारतळी मनसे संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

मनसेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केले जंगी स्वागत

आबलोली (संदेश कदम) : राष्ट्रीय लोक तक्रार निवारण आयोग संलग्न निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांत सुर्वे यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी शशिकांत सुर्वे यांचे शाल घालून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले.

यावेळी पत्रकार संदेश कदम, पत्रकार गणेश कीर्वे, दापोलीचे संजय बारसे आणि महाराष्ट्र सैनिक राहुल जाधव आदी उपस्थित होते. शशिकांत सुर्वे यांनी मनसेच्या संपर्क कार्यालयाची आणि राजसाहेबांची भरभरून स्तुती करून गरीब जनतेची कामे करा असा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!