मुख्य बातमीशैक्षणिक

पटवर्धन हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन नगरपालिका आणि पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची गरज याविषयी माहिती दिली. नगरपालिकेचे अमर लोखंडे (दिव्य स्वप्न फाउंडेशनमार्फत ‘वसुंधरा’ अभियानाचे समन्वयक) यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जाणिवा अधिक दृढ झाल्या.

पंचायत समितीच्या विषय साधन व्यक्ती श्रीमती जंगम यांनी पर्यावरणविषयक आशयपूर्ण कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कवितेमुळे कार्यक्रमास भावनिक आणि विचारप्रवृत्त करणारा स्पर्श झाला.

या निमित्ताने पर्यावरण जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले, ज्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार रत्नागिरी मधून प्रचार फेरी काढण्यात आली

कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तानाजी वाघमारे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. भुवड यांची विशेष उपस्थिती लाभली. उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर आणि पर्यवेक्षक श्री. लवंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!