मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्यावतीने ३० जून रोजी १३१ वी डाक अदालत

रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारा ३० जून रोजी १३१ वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल घेतली जाईल.
विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी.
डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डींग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्या नावे २ प्रतिसह २० जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.


