रत्नागिरीमध्ये शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस अनेक उपक्रमांनी साजरा

रत्नागिरी : शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीतर्फे ८ जून रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शर्मिला ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी गाऱ्हाण घालण्यात आले. तसेच मनसे जिल्हा कार्यालय येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
जिल्हा रुग्णालयामार्फत सुमारे १०० महिलांच्या रक्ताच्या विविध तपासणी करून त्यावर त्यांना मोफत औषध देण्यात आली. सोबतच महिलांसंदर्भातील विविध आजाराच्या तपासण्या करून ज्यांना अधिक उपचारांची गरज आहे अशा महिलांना जिल्हा रुग्णालयामार्फत पुढील तारीख देऊन बोलाविण्यात आले आहे.

“आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंब चालविणाऱ्या महिला निरोगी असल्या की संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य स्थिर रहाते. दिवसभराच्या राहटामध्ये अनेक महिला आपले आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात म्हणून सर्वासामान्य महिलांकरिता या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,” असे अरविंद मालाडकर यांनी सांगितले.

हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीतर्फे महिला शहर अध्यक्ष सुस्मिता सुर्वे, शहर सचिव संपदा राणा, गीता गोसावी, काजल गोसावी, रूपाली गोसावी, नंदिनी गोसावी यांच्या विशेष सहकार्याने राबविण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, शहर सचिव गौरव चव्हाण, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, उपशहर अध्यक्ष परेश शेट्ये यांचे विशेष सहकार्य लाभले.


