अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ तालुका गुहागरची कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी सागर मोरे, तर सचिवपदी संदेश हुमणे

आबलोली (संदेश कदम) : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई या मंडळाच्या गुहागर तालुका भजनी कलाकारांची सभा ८ जून रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात उत्साहात झाली. या सभेत अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका अशी नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी सागर मोरे (गुहागर), उपाध्यक्षपदी संतोष पांचाळ (शिवणे), सचिवपदी संदेश हुमणे(गुहागर), खजिनदारपदी अभय साटले (गुहागर) यांची निवड जाहीर करण्यात आली.
या सभेला गुहागर तालुक्यातील ज्येष्ठ, श्रेष्ठ यांच्यासह तरुण भजनी कलाकारांची उपस्थिती होती. इतर कलाकारांना सरकारकडून सर्व फायदे मिळतात तसेच फायदे सरकारकडून भजन मंडळातील प्रत्येक कलाकारांना, प्रत्येक घटकाला मिळावे सरकारी अनुदान प्राप्त व्हावे यासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई यांच्या विनंतीनुसार गुहागर तालुका भजनी कलाकार यांची अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका अशी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या मंडळाच्या
मंडळाची नूतन कार्यकारिणी अशी : सागर मोरे (गुहागर), उपाध्यक्षपदी संतोष पांचाळ (शिवणे), सचिवपदी संदेश हुमणे(गुहागर), खजिनदारपदी अभय साटले (गुहागर). सदस्य : संदीप शिरधनकर (गुहागर बाग), महेंद्र वराडकर (गुहागर), सचिन जाधव (नरवण), सुधाकर पिलवलकर (निगुंडळ), जयराम ठाकूर (कोंडकारुळ), अरुण बागकर (गुहागर बाग), विनायक जोशी , प्रदीप साटले, शैलेश शेटे, आदेश मोरे, उमेश गोयथळे (गुहागर), सुहास चव्हाण (पालशेत), परवेश देवकर(आरे), सतीश मोरे, उमेश शिंदे (वेळणेश्वर), तर कायदेशीर सल्लागारपदी जिल्हा कमिटीसाठी मयुरेश पावसकर, महेश होळंब (पालशेत), संदेश पोळेकर (कोंडकारुळ) आणि विभाग कमिटीसाठी मिनार पाटील (पालशेत), मंदार जाधव (नरवण) यांची निवड करण्यात आली.



