मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

रत्नागिरी : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील पारपत्र (पासपोर्ट) केंद्रासाठी आवश्यक संगणक, फर्निचर व इतर साधनसामग्री खरेदी करण्यात आली आहे. या साहित्याचे वितरण आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासोबतच पोलीस दलाला आवश्यक सुविधा आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याला आमचे प्राधान्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होमगार्ड भरती, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, तसेच पोलीस दल आणि श्वान पथकासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!