मुख्य बातमीसामाजिक

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपण

गुहागर : भविष्यातील पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आज वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे आदर्श व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, जेष्ठ समाजसेवक तसेच श्री गजानन विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण होरंबे यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी श्री गजानन विद्यामंदिर- निवोशी प्राथमिक शाळा परिसरात मंडळाचे प्रतिनिधी मोहन धावडे यांच्या संकल्पनेतून श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी) संलग्न युवा मित्र मंडळाच्या वतीने वृक्षरोपण उपक्रम राबवून समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांना वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या.

निवोशी अंगणवाडी व प्राथमिक शाळा या ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी गुलमोहर, बदाम, अशोक, पिंपळ अशी विविध झाडे युवा मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप होरंबे यांनी मुंबई येथून आणली. युवा मंडळाचे अध्यक्ष सुनील रावणंग, सेक्रेटरी लव ठोंबरे यांच्यासह अरविंद धावडे, निलेश अवेरे, संदीप होरंबे, सुजित रांजाणे, अंकुश ठोंबरे, सखाराम सोलकर, सुनील सोलकर, लक्ष्मण मांडवकर, शांताराम मांडवकर, नारायण अवेरे, शुभम मांडवकर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका वैशाली घाणेकर, मदतनीस रश्मी धावडे, ममता अवेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आदिती ठोंबरे, मनस्वी ठोंबरे, आर्यन पिंपळे, सोहम अवेरे, पुनम होरंबे, सेजल सोलकर या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला यांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला. संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेत एक-एक वृक्षाची देखभाल पालनपोषण करण्याचा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी ) संलग्न:युवा मित्र मंडळ, महिला व ग्रामस्थांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!