एडीप व वयोश्री योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी साहित्य वाटप शिबिर उद्यापासून

रत्नागिरी : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपासाठी २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पुढील वेळापत्रकानुसार होणाऱ्या शिबिरात साहित्य वितरण होणार आहे. या लाभार्थींनी साहित्य स्वीकारण्यासाठी येताना तपासणीदरम्यान त्यांना मिळालेली पावती व आपले आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
खासदार नारायण राणे व खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप व वयोश्री या भारत सरकारच्या योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपासाठी २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या दिव्यांग तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना खालील वेळापत्रकानुसार होणाऱ्या शिबिरात साहित्य वितरण होणार आहे. या लाभार्थींनी साहित्य स्वीकारण्यासाठी येताना तपासणी दरम्यान त्यांना मिळालेली पावती व आपले आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
या वितरण शिबिरांचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत मंत्री यांच्या हस्ते उद्या (१६ जून) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, ता. रत्नागिरी येथे होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी आपले साहित्य स्वीकारण्यासाठी १० ते सायंकाळी ४ या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वितरण शिबिरांचे तालुकानिहाय वेळापत्रक असे :
रत्नागिरी – १६ जून सकाळी १० ते सायंकाळी ४, एडीप, वयोश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी.
राजापूर – १७ जून सकाळी १० ते सायंकाळी ४ एडीप, वयोश्री, आबासाहेब मराठे कॉलेज हातीवले राजापूर.
लांजा – १८ जून सकाळी १० ते सायंकाळी ४, एडीप, वयोश्री न्यू इंग्लिश स्कूल, लांजा.
संगमेश्वर – १९ जून सकाळी १० ते सायंकाळी ४ एडीप, वयोश्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती, देवरुख.
चिपळूण – २० जून सकाळी १० ते सायंकाळी ४ एडीप, वयोश्री ग्रामीण रुग्णालय कामथे, चिपळूण.
गुहागर – २१ जून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता एडीप, वयोश्री पंचायत समिती, गुहागर.
दापोली – २३ जून सकाळी १० ते सायंकाळी ४ एडीप, वयोश्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं.समिती दापोली.
मंडणगड – २४ जून सकाळी १० ते सायंकाळी
४ एडीप, वयोश्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड.
खेड – २५ जून सकाळी १० ते सायंकाळी ४ एडीप, वयोश्री सभापती निवासस्थान पं.समिती खेड.


