मुख्य बातमीशैक्षणिक

जि. प. पूर्णगड नं. १ शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्णगड नं. १ शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात नवागतांची स्वागत रॅली काढण्यात आली. त्यानंतर नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, दानशूर व्यक्तींकडून प्राप्त शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पोलीस पाटील, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशोत्सवासाठी पालकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!