मुख्य बातमी

चांदोर ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य उपकेंद्र, शाळा, महिला बचत गट यांना साहित्य वाटप

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायतीमार्फत १५ वा वित्त आयोग अंतर्गत गोताडवाडी साईकृपा बचत गटाला गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी घरघंटी देण्यात आली. शाळांची शैक्षणिक व डिजिटल क्षेत्रात प्रगती सुधारण्यासाठी सॉफ्टवेअर सहित एलईडी टीव्ही शाळा चांदोर क्र. ४ येथे देण्यात आली. तसेच आशा सेविका घरोघरी भेट देत असताना रुग्णांचे बीपी, शुगर, हिमोग्लोबीन तपासण्यासाठी मशीन व आरोग्य उपकेंद्रसाठी बेड, फिटोस्कोप, कपाट देण्यात आले.

या कार्यक्रमाला सरपंच सौ. पूनम मेस्त्री, उपसरपंच सूर्यकांत तांबे, उपसरपंच तथा विद्यमान सदस्य उमेश गोताड, सदस्य राजेंद्र बनकर, पूजा तोडणकर, विशाखा फुटक, ग्रामपंचायत अधिकारी आनंद कुडाळकर, आरोग्य सेवक निलेश गुळेकर, मुख्याध्यापक राजीव आंबेकर, सीआरपी सौ. नेहा तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!