मुख्य बातमी

अमली पदार्थ बाळगणारा एकजण ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना गवळी वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचा गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जहीर मेहमूद काजी (वय ४५, रा. गवळीवाडा ता. जि. रत्नागिरी) याला दोन पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने मा. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिशन कॅम्प ते गवळी वाडा जाणाऱ्या रोडवर गस्त घालत असताना पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार असलेला जहीर मेहमूद काजी त्याच्या ताब्यातील मोटर सायकलवर बसून संशयित हालचाली करत असताना दिसून आला.

जहीर काझी याचा या पथकाला संशय आल्याने तसेच त्याच्या ताब्यात कोणता तरी अमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याने त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्यासाठी दोन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये हिरवट काळपट रंगाचा व उग्र वासाचा “गांजा” सदृश्य ५३९ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आढळून आला. त्याला दोन पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच त्याचे ताब्यातून १५ हजार रुपये किंमतीचा गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जहीर काझी याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.

ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक श्री. ओगले, पोहवा शांताराम झोरे, पोहवा बाळू पालकर, पोहवा अमित कदम, पोहवा योगेश नार्वेकर, पोहवा योगेश शेट्ये, म. पोहवा श्रीमती वैष्णवी यादव यांनी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!