मुख्य बातमी

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाची १ ते ८ जुलै कालावधीत परीक्षा

रत्नागिरी : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड संवर्गात २८४ पदे भरतीसाठी आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची १ जुलै ते ८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाने कळविले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) कडून पाठविण्यात येणार आहे. परीक्षेकरिता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध रहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड संवर्गात २८४ पदे भरतीसाठी २२ एप्रिल रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता “आयबीपीएस” कंपनीस नियुक्त केले आहे. व त्यानुसार “आयबीपीएस”कडून २२ एप्रिल ते १६ मे २०२५ कालावधीत ऑनलाईनपध्दतीने अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!