अमृत गोरे यांची सकल धनगर मल्हार सेनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : सकल धनगर मल्हार सेनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अमृत अंकुश गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी तसे नियुक्तीपत्र नुकतेच अमृत गोरे यांना दिले.
धनगर समाज राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत असून, संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. अमृत गोरे यांचे सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाची नोंद घेऊन त्यांची जिल्हाधक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
“देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आजही काही ठिकाणी धनगर वाड्यांना अजूनही वीज, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कुठे तरी या समाजावर अन्याय होत असल्याची भावना असून, जिल्हाभरातील वाड्या-वस्त्यांमध्ये फिरून तिथल्या समाजाच्या अडचणी समजून घेणार आणि त्या सरकार समोर मांडणार. तसेच
काही ठिकाणी धनगर वस्त्यांना आजही रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही. या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमृत गोरे यांनी निवडीनंतर सांगितले.


