जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट
रत्नागिरीतील श्री मारुती - गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळीतर्फे आयोजन

रत्नागिरी : श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त, आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे २६४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट २५-०० असा जिंकून चांगली सुरवात केली होती परंतु रियाज याने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढील दोन्ही सेट २५-१५, २५-०४ असे जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली यान, अभिषेक चव्हाण या जोडीने राहुल भस्मे देवरुख व मुक्तानंद वरवडेकर चिपळूण या जोडीचा ११-०५ व १६-०० असा सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. रत्नागिरी कॅरम स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच राजापूरची निधी सप्रे व रत्नागिरीची स्वरा मोहिरे अश्या महिला व किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात दोन्ही सारखेच स्पर्धक होते. महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरे तर किशोरी गटाचे विजेतेपद निधी सप्रे हिने मिळवले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर, विश्वस्त मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये, सदस्य विनय गांगण, विवेक देसाई, स्पर्धेतील प्रमुख पंच प्रकाश कानिटकर सहाय्यक पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी, सचिन बंदरकर तसेच टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे.
१) पुरुष दुहेरी : अंतिम सामना – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर (११-०५, १६-००)
उपांत्य फेरी १ : राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर विजयी विरूद्ध विजय कोंडविलकर / दामोदर घाणेकर (१०-१२,१२-१०,१२-१०) उपांत्य फेरी २ : रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूद् विशाल ओतारी / सुनील जाधव (२५-००, २५-००)

२) पुरुष एकेरी अंतिम सामना रियाज अकबरअली विजयी विरूद्ध अभिषेक चव्हाण (००-२५, २५-१५, २५-०४)
उपांत्य फेरी १ : अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध अनिल गांधी (२५-१०,१६-१४)
उपांत्य फेरी २ : रियाज अकबरअली विजयी विरूद्ध राहुल भस्मे (२५-१०, २५-१५)
३) वयस्कर पुरुष गट एकेरी : अंतिम सामना – दामोदर घाणेकर विजयी विरूद्ध विश्वनाथ शिवलकर (२०-१६, १६-०८)

उपांत्य फेरी १- दामोदर घाणेकर विजयी विरूद्ध गणेश पाटणकर (१०-२५,२५-११,२५- ११) उपांत्य फेरी २ : विश्वनाथ शिवलकर विजयी विरूद्ध प्रकाश कानिटकर (१४-२५,२५-००,२५-००)
४) महिला गट एकेरी : अंतिम सामना – स्वरा मोहिरे विजयी विरूद्ध निधी सप्रे ( २५-१२, १२-२५,२१-२०)
उपांत्य फेरी १ : स्वरा मोहिरे विजयी विरूद्ध ईशा खैरे (१४-२४,२२-०५,१९-११)
उपांत्य फेरी २ : निधी सप्रे विजयी विरूद्ध स्वरा कदम (२५-०४,१४-१९,२५-०४)
५) कुमार गट एकेरी : अंतिम सामना – ओम पारकर विजयी विरूद्ध हर्षल पाटील ( २५-००, २५-०४)
उपांत्य फेरी १ : ओम पारकर विजयी विरूद्ध आर्यन राऊत (१३-०२,१०-१२,२०-००)
उपांत्य फेरी २ : हर्षल पाटील विजयी विरूद्ध द्रोण हजारे (०८-०२,०२-१०,१०-००)
६) किशोर गट एकेरी : अंतिम सामना – वेदान्त करगुटकर विजयी विरूद्ध आदित्य देसाई (११-०४,१५-००)
उपांत्य फेरी १ : वेदान्त करगुटकर विजयी विरूद्ध आराध्य शेट्ये (१३-०२,०८-००)
उपांत्य फेरी २ : आदित्य देसाई विजयी विरूद्ध कपिश देसाई (१६-००,०७-०६)
७) किशोरी गट एकेरी : अंतिम सामना – निधी सप्रे विजयी विरूद्ध स्वरा मोहिरे (२५-१२, १२-२५,१३-०१)
उपांत्य फेरी १ : निधी सप्रे विजयी विरूद्ध श्वावस्ती कांबळे (२५-०४,२५-००)
उपांत्य फेरी २ : स्वरा मोहिरे विजयी विरूद्ध शुभ्रा कदम (२५-००,१३-००)
स्पर्धेत एकमेव ब्लाक टू फिनिशची नोंद रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने केली. स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली. स्पर्ध्या यशस्वी होण्यासाठी आनंद भिडे, मनोहर केळकर, मंदार खेर, निखिल आंबडेकर, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी भरपूर मेहनत घेतली.



