
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचरांना १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत जि. प. महिला परिचर महासंघातर्फे प्रशासनाला सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.
अंशकालीन महिला परिचर या आंदोलन करीत आहेत; परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. शेवटी १ जुलैपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी त्यांनी जिल्हा परिचर संघटनेच्या आकांक्षा कांबळे, सुप्रिया पवार, अश्विनी घडशी, मेघा राणे, मनीषा जाधव आदी उपस्थित होत्या.
अंशकालीन या नावात बदल करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला परिचरांमधून पेट घेण्यात यावे, वेतन २१ हजार देण्यात यावे आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत आहेत. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ३५० अंशकालीन महिला परिचर आहेत.



