मुख्य बातमीशैक्षणिक

रा. भा. शिर्के प्रशालेत जीएस पदाची निवडणूक उत्साही वातावरणात संपन्न

रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत ३० जून रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या जनरल सेक्रेटरी (जीएस) पदाच्या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दहावी अ मधील भावेश अमरेश पावसकर आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून दहावी इ मधील वैष्णवी विलास चौघुले मताधिक्याने निवडून आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे मूल्य बिंबवण्यासाठी व भारतातील मतदान प्रक्रियेची ओळख होण्याच्या उद्देशाने निवडणूकीचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून प्रशालेत घेतला जातो.

या निवडणुकीसाठी दहाव्या इयत्तेतील सहा विद्यार्थिनी व चार विद्यार्थी उमेदवारांनी सहभाग घेतला होता. प्रशालेच्या स्वराज्यसभा विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपन्न झाला.

दोन्ही विजयी उमेदवार भावेश पावसकर आणि वैष्णवी चौगुले या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, स्वराज्य सभा व सांस्कृतिक विभाग आणि या विभागांना सहकार्य करणारे सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी या सर्वांचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार व पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!