मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण
राष्ट्रीय ओबीसी महासंघ मुंबई प्रदेश युवा अध्यक्षपदी ॲड. विनेश वालम यांची नियुक्ती

आबलोली ( संदेश कदम ) बळीराज सेनेचे युवा नेते उत्तम अभ्यासक संघटक ॲड. विनेश अशोक वालम यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ मुंबई प्रदेश युवा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर संपूर्ण राज्यातून ॲड. विनेश वालम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान या निवडीनंतर त्यांचेशी संपर्क साधला असता सर्वांना सोबत घेऊन विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेऊन विकास कामे करणार असून सांगतानाच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे ॲड. विनेश वालम यांनी आभार मानले.


