काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खुले चर्चासत्र

रत्नागिरी : उद्या (२१ जुलै) सकाळी ११.३० वाजता रत्नागिरी काँग्रेस भवन येथे चर्चासत्र अयोजित केले आहे.
यात आम्ही मराठी आम्ही भारतीय, जन सुरक्षा रक्षक कायदा एक दडपशाही, स्मार्ट मीटर सर्वसामान्यांना आर्थिक फटका, शेतकरी कर्ज मुक्ती आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच या मुद्द्यांसंदर्भात चर्चासत्राचे इतिवृत्त तयार करण्यात येणार असून, शासनाकडे त्याप्रमाणे दाद मागण्यात येणार आहे. यावेळी कोणाला लेखी निवेदन द्यायचे असल्यास देता येणार आहे.
या चर्चा सत्राला सर्व काँग्रेसजन, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि सामाजिक संस्था, संघटना, जागृत नागरिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि शेतकरी कष्टकरी संघटनेचे (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केले आहे.



