मुख्य बातमी
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे २४ जुलै रोजी “रत्नदुर्ग”वर दीपपूजन

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रत्नागिरी विभाग यांच्या वतीने शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला, हनुमान मंदिर येथे आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्येनिमित दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २४ जुलै रोजी ७ वाजता होईल.
गडकिल्ल्यांचे तेज पुन्हा जागविण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी हा दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार असून, हा दीपोत्सव आपली संघटनात्मक एकता, संवर्धन कार्यातील निष्ठा व सांस्कृतिक जाणीव दर्शवणारा ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पाडावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी तन्मय जाधव (8379012347), दीपेश वारंग (9920905920) यांच्याशी संपर्क साधावा.



