अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये” सहभाग घेण्यासाठी आवाहन

रत्नागिरी : केंद्रीय सिव्हिल सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या “अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये” महाराष्ट्र शासनाच्या वतीने सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी अर्ज व्यवस्थापक सचिवालय जिमखाना, मुंबई – 400032 येथे टपालाद्वारे, प्रत्यक्ष किंवा ईमेलद्वारे (sachivalayagym@rediffmail.com / sachivalyagym1954@gmail.com) पाठवावेत. अधिक माहितीसाठी तसेच अर्ज मिळवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट नं. OS-15, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा, विविध क्रीडा व कला प्रकारांतील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू / नियमित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, कॅरम,बुध्दीबळ, अॅथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो खो, योगा सत्र, संगीत,नृत्य व लघुनाट्य इत्यादी क्रीडा व कला प्रकारांत अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांतून ज्या खेळाडू / कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदनपत्र (प्रत्येक क्रीडा व कला प्रकारासाठी वेगळे) भरून ते,
कार्यालय प्रमुख/ विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगावू प्रतीसह पाठवावे.



