मुख्य बातमी

उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित “स्मार्ट श्रावण सखी 2025”

महाअंतिम सोहळा - रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025

रत्नागिरी : स्मार्ट श्रावण सखी या स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी 2 ऑगस्ट रोजी स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी 4 ते 8 या कालावधीत संपन्न होईल. प्राथमिक फेरी मधील सहभागी स्पर्धकांमधून स्मार्ट 20 महिलांची निवड महाअंतिम फेरीमध्ये होईल.

असे असेल प्राथमिक फेरीचे स्वरूप : पहिली फेरी : 2 मिनिटांची असेल. महिला स्पर्धकांनी पारंपारिक पेहरावात सादरीकरण करून स्वत:ची ओळख करून द्यायची आहे. (स्वपरिचयामध्ये महिलांनी आपले पूर्ण नाव, कौटुंबिक माहिती (उदा. कुटुबांतील भुमिका इ.), आवडीनिवडी, स्पर्धेतील सहभागाचा उद्देश याबाबत माहिती देणे महत्त्वाचे राहिल.) दुसरी फेरी : 2 मिनिटे – बुध्दीचातुर्य क्षमता (परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तर द्यायची आहेत.

स्पर्धेचे वेगळेपण : प्राथमिक फेरीमधुन निवड झालेल्या 20 स्पर्धकांसाठी कौशल्यावर प्रशिक्षण. ६, ७ आणि ८ ऑगस्ट या तीन दिवसांत स्पर्धकांना विविध कौशल्यांवर प्रशिक्षण देण्यात येईल. रंगमंचावरील वावर आणि नृत्य कला, संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, योगा / मेडिटेशन / व्यक्तिमत्त्व विकास सत्र.

“स्मार्ट श्रावण सखी 2025”ची महाअंतिम फेरी रविवार, 10 ऑगस्ट 2025 रोजी होईल. यात स्वत:ची ओळख करून देणे, रंगमंचावरील आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण (Catwalk Round), तुमच्या मधील कौशल्याचे सादरीकरण, परिक्षकांचे प्रश्न आणि तुमची अचूक उत्तरे हे पाहिले जाईल.

ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे. स्पर्धा रत्नागिरी शहर व तालुका मर्यादित आहे. सौंदर्याबरोबर बुद्धीचातुर्य व कला यांवरही भर दिला जाईल. महाअंतिम फेरी पूर्वीचे सराव शिबिर अनिवार्य. महाअंतिम स्पर्धेतील स्पर्धकांनी कार्यक्रम स्थळी सकाळी 10 वाजता येणे आवश्यक. सौ. शिल्पा सुर्वे (8975838181), सौ. स्मितल पावसकर (9421230177), सौ. कांचन नागवेकर (940574138) यांच्याकडे नोंदणीसाठी संपर्क साधावा.

बक्षिसे

 स्मार्ट श्रावण सखी 2025 विजेती (रोख रू. 10,000/- मुकुट, बेल्ट, साडी आणि चषक)

 पहिली उपविजेती (1st Runner Up)

(रोख रू. 7000/- बेल्ट, साडी आणि चषक)

 दुसरी उपविजेती (2nd Runner Up) (रोख रू. 5000/- बेल्ट, साडी आणि चषक)

विशेष बक्षिसे

उत्तम व्यक्तिमत्व : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)

उत्कृष्ट पेहराव : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)

मोहक हास्य : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)

उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्व : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)

स्पर्धेतील फेऱ्या व नियम बदलण्याचे सर्व अधिकार आयोजक व परिक्षकांकडे राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!