मुख्य बातमी

जिल्हा पोलिस अधीक्षकांची जयगड पोलिस ठाण्यात समन्वय बैठक 

वाटद-खंडाळा एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवर वाटद गाव व परिसरात भेट

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी जयगड पोलिस ठाण्यात समन्वय बैठक घेतली. तसेच वाटद गाव व परिसरात भेट संबंधी जयगड पोलीस ठाणे येथे समन्वय बैठक घेतली तसेच वाटद, खंडाळा एमआयडीसी परिसराला भेट दिली.

या बैठकीदरम्यान वाटद, खंडाळा येथील ग्रामस्थांनी त्यांचे मुद्दे पोलिसांसमोर मांडले. त्याचप्रमाणे पोलिसांनीही प्रत्येक पाड्यांना भेट देत सरकारचे मुद्दे मांडले. गावाच्या विकासासाठी एमआयडीसी कशी आवश्यक आहे यावर सकारात्मक चर्चा केली. गावागावात जाऊन लोकांची भेट घेतली.

या बैठकीदरम्यान रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक जि.वि.शा. अश्वनाथ खेडकर, जयगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!