गाव बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांचे आमदार किरण सामंत यांच्याकडून कौतुक
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते कृषी साहित्याचे वाटप

लांजा : आमदार किरण सामंत यांचा लांजा तालुक्यात ग्रामपंचायती निहाय भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील विकासकामांचा आढावा घेत ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या संदर्भात तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना सहित आमदार किरण सामंत यांनी या बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये गावागावातून चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ज्या ज्या गावांमध्ये समस्या मांडण्यात आली त्याचे थेट उत्तर त्याच सभेमध्ये आमदार किरण सामंत यांनी देऊन जागच्या जागी प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचा लांजा तालुक्यातील ग्रामपंचायती निहाय भेट दौरा होणार असून या दौऱ्याच्या पहिला टप्पाला कालपासून (२४ जुलै) सुरुवात झाली. यामध्ये २४ जुलै रोजी तालुक्यातील आंजणारी, वेरळ, कणगवली, तळवडे, कुरचंब, आडवली या सहा ग्रामपंचायतींना भेट देण्यात आली. ग्रामपंचायती निहाय या दौऱ्यामध्ये आमदार किरण सामंत यांच्यावतीने संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित गावाच्या विकासात येणाऱ्या अडचणींची आमदार किरण सामंत प्रत्यक्ष जावून समजावून घेतला. यासोबतच गावातील सुरू असलेल्या तसेच नियोजित विकासकामांचा घेऊन त्याबाबत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असा शब्द दिला.

या दौऱ्यादम्यान वेगवेगळे प्रश्न गावातील लोकांनी उपस्थित केले. त्यामध्ये महावितरण, एसटी, पाणी, शाळा आरोग्य, रस्ते, पर्यटन, कृषी, मोबाईल नेटवर्कसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे बचत गटाच्या रोजगाराच्या दृष्टीने लवकरच ठोस पावले उचलले जातील, असा शब्द आमदार किरण सामंत यांनी या दौऱ्यादरम्यान दिला आहे. काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये चांगले काम केले असल्याचे या गाठीभेटीदरम्यान आमदार किरण सामंत यांच्या लक्षात आले या चांगल्या कामाच्या अधिकाऱ्यांचे आमदार किरण सामंत यांनी कौतुक केले आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापी मारली. अधिकाऱ्यांनी जनतेची कामे करावी त्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आपले नेमणूक आहे हे विसरू नका माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी मी काम करत आहे त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने काम करा, असे आदेशही या बैठकी दरम्यान दिले. विशेषतः या दौऱ्यामध्ये ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

या दौऱ्यावेळी लांजा तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील सक्षम अधिकारींनी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजपकर, मा.शिक्षण सभापती विलास चाळके, गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खांमकर, संदीप दळवी, सुजित आंबेकर, दिनेश पवार, प्रसाद माने, मानसी आंबेकर, एस. एन. कांबळे, चेतन खंदारे, यांच्या सहित प्रमुख पदाधिरी उपस्थित होते.



