पालकमंत्री डॉ. उदय सामंत उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत उद्या (२६ जुलै) हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शनिवारी (२६ जुलै) रोजी सकाळी ९ ते ११ वाजता पाली निवासस्थान येथे राखीव (स्थळ : पाली). दुपारी १२ वाजता पडवे (ता. गुहागर) येथील ग्रामस्थांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी) दुपारी १.३० वाजता रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक व बागायतदार यांच्या अडीअडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी ३ वाजता उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा – २०२५ : करबुडे जि.प. गट येथे भेट (स्थळ : दत्तकृपा मंगल कार्यालय, जाकादेवी). दुपारी ४ वाजता वाटद एमआयडीसी समर्थनार्थ मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : सर्वसाक्षी हॉल, खंडाळा) सायंकाळी ७ वाजता श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सवानिमित्त बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवारी (२७ जुलै) रोजी सकाळी १० वाजता मिरकरवाडा मासेमारी बंदर येथील विकासकामांचे भूमीपूजन (स्थळ : मिरकरवाडा बंदर, रत्नागिरी) सकाळी १०.४५ वाजता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व प्रसिद्ध व्याख्यातांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह ). सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथून मोटारीने खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता खेड न.प.अंतर्गत नुतनीकरण करण्यात आलेल्या स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : खेड, जि. रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता खेड, जि. रत्नागिरी येथून मोटारीने हेदवी, ता. गुहागर जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : खारवी समाज भवन, हेदवी, ता. गुहागर) सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्री १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.



