मुख्य बातमी

जिल्हा न्यायालयात “सेक्स ट्रॅफिकिंग” विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी “सेक्स ट्रॅफिकिंग” या अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम नुकताच जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने ARZ संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग येथील सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या माजी सदस्य सचिव व माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (गोवा) न्यायमूर्ती श्रीमती सयोनारा टेलेस लाड (निवृत्त), ARZ (NGO) चे संस्थापक व संचालक अरुण पांडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

कार्यक्रमात विविध सेवाप्रदाते व असुरक्षित गटांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सेक्स ट्रॅफिकिंगच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर उपाययोजना, मदत केंद्रांची भूमिका, मानसिक आरोग्य व पुनर्वसन यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!